दुर्गा भागवत यांनी मराठी साहित्यात ललित लेखन, समीक्षा व संशोधन या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. तत्वचिंतक या नात्याने त्यांनी मराठी चिंतनविश्व संपन्न बनविले आहे. एखादी प्रखर बुद्धिमान स्त्री आपल्या स्त्रीत्वाच्या पारंपारिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन आपला झळझळीत असा निराळा अवकाश निर्माण करू शकते याचा अभिमानास्पद दाखला दुर्गा भागवत या लेखिकेने निर्माण केला....