१९६७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या या कादंबरीमध्ये साठोत्तरी कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये एकवटली आहेत.
एक मनस्वी तरुण रस्त्यावर येतो. आख्खं गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात धुमाकूळ करतो. बापाला बाप न मानणार्या अशा तरुणांचं पुढे काय हातं? ते भाऊ पाध्यांच्या नजरेतूनच पाहायला हवं.
मराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह आहे. या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणार्या आहेत.