शेफाली वैद्य यांचं पुस्तक पालकत्वाकडे वेगळ्या संवेदनक्षमतेनं पाहतं आणि तरीही भावनांवर ताबा मिळवून मुलांबद्दलचा विचार विशाल सामाजिक दृष्टीला जोडून जागं करतं. चांगले पालक मुलांशी कसे वागतात हे कळण्यासाठी अशा पुस्तकांचा चांगला उपयोग होतो, एक दिशा मिळते, म्हणून अशा पुस्तकांची गरज समाजाला आहे.