ऐतिहासिक दृष्टीकोनातून कादंबरीचे विवेचन करताना कालानुक्रमाला अनेकदा खूप महत्व दिले जाते. लेखनाच्या कालानुक्रमाने कादंबर्यांचे वर्णन केले की कादंबरीचा इतिहास सिद्ध होतो, असा गैरसमजही पसरलेला आहे. या दृष्टीकोणातून केवळ कादंबरीचाच नव्हे, तर कोठलाही इतिहास काळाच्या प्रवाहात एका दिशेने पुढे जाणार्या कथनासारखा उलगडत असतो. असे गृहीत धरावे लागते.