अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कदाचित विहिरीचा, नदीचा किंवा अगदी सागराचा तळ गाठणेही शक्य होईल पण कवितेचा, कविमनाचा तळ गाठणे, तळाशी असलेले प्रेयस आणि श्रेयस वेचून, काठाशी परतल्यावर त्या क्षितिजावरून पुन्हा स्वत:च्या अंतरंगाचा, चित्र-विचित्र कंगोरे असलेल्या जीवनाचा त्यातील गुढाचा शोध घेणं आणि मानवी स्वभावाच्या बहुरंगी इंद्रधनूला पाहणं हे त्याहूनही...