श्री. जोशी यांच्या या लेखसंग्रहामुळे ज्ञानेश्वर, नामदेव, मोरोपंत आणि चोखामेळा या महाराष्ट्रातील चार थोर कवींचे जीवनदर्शन वाचकांना आधुनिक कथेच्या माध्यमातून घडेल.
सर्व संतांमधून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक लोकशाहीचे दोन संत मुकुटमणी ज्ञानेश्वर हे भागवत धर्माचा पाया तर तुकाराम हे कळस होय. तुकोबांच्या जीवनाचे नि वाङ्मयाचे रसाळ व रवाळ वाणीत वर्णन स. कृ. जोशी यांनी केले आहे.