माणसाला फार पूर्वीपासून परग्रहावर जीवसृष्टी आहे का, असल्यास यावर मानवजात असेल का, ती आपल्यापेक्षा किती प्रगत असेल असे प्रश्न पडत आलेले आहेत. अशाच एका अज्ञात ग्रहावरील प्रगत जीव पृथ्वीवर यायला निघाले आणि त्यांची चाहूल लागल्यावर प्रश्न पडलं, हे आपले मित्र असतील की शत्रू?
धर्मयोध्दा : लक्ष्मण लोंढे यांचा हा उत्कृष्ट कथांचा संग्रह. या कथांमधील व्यक्तीमत्त्वे जरी मध्यमवर्गातीलच आहेत तरी स्त्री-पुरुष संबंधांचे तेच तेच पदर उलगडून दाखविण्याऐवजी या कथांतून आजच्या जीवनात आढळणारा मानवी जीवनातील संघर्ष, कोंडमारा, कुचंबणा, अगतिकता, अन्याय हे प्रतिबिंबीत करायला आवडतात आणि तेच या कथांचे वैशिष्ट्य आहे.