समाज आणि पोलिस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत असलेले उच्चशिक्षित डॉ. बी. जी. शेखर पाटील एक संवेदनशील लेखक आहेत. अंधार्या वाटांनी सावजाचा शोध घेणार्या खतरनाक गुन्हेगारांचा प्रतिशोध घेणारा हा सत्यकथासंग्रह. प्रत्येक कथा वेगळी असून सहज सुलभ भाषाशैली आणि शेवटपर्यंत श्वास रोखून ठेवणार्या सस्पेन्समुळे प्रतिशोध सारखे-सारखे वाचावेसे वाटते.