स्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक.