“एका शिकारीची गोष्ट" हे पुस्तक वाचून हादरुन गेलो. या पुस्तकाची वेगवेगळी रुपं आहेत. एक आहे चित्तथरारक रहस्य कथेसारखं उत्कंठा वाढवत नेणारं आणि दुसरं म्हणजे राजेंद्र केरकर या माणसाचं काम, कामाची पद्धत, त्याचे पर्यावरणीय महत्व...हे सांगणारं... - अनिल अवचट
“आबे फारीया" नावाचा एक महान माणूस या पृथ्वीतलावर वावरुन गेला. संमोहन म्हणजे कोणतेही गूढ शक्ती नसल्याचे ठणकावून सांगितले. त्याच्या या अनोख्या प्रवासाची ही कहाणी.