मराठीचे प्रमाणलेखन, मराठीभाषा व देवनागरीलिपी यांवरील लेखांचा संग्रह. अर्थसातत्य, लेखनाचे उच्चसापेक्ष नव्हे तर दृश्यसापेक्ष महत्त्व, स्थिर नियमांचे महत्त्व, संस्कृत परंपरेचे मराठीशी असलेले सांस्कृतिक नव्हे तर शास् त्रीय नाते, मराठी उच्चारांच्या संदर्भातील नागरी लिपीचे अपुरेपण, बोली, प्रमाण उच्चार आणि लिपी यांचे परस्परसंबंध इ. संदर्भातील तुमचे विचार मूलभूत,...