एका बाजूस शरीरचना (Anatomy), शरीरविज्ञान (Physiology) आणि शरीरविकृती (Pathology) यांचा फारसा गंध नसलेले योगशिक्षक आणि दुसर्या बाजूस अत्यंत आक्रमकतेने योगाचा प्रचार व प्रसार करून पाहणारे योगाचे व्यापारी यांचे कात्रीत सापडलेल्या आधुनिक बुद्धिवादी योगप्रेमींना योगाची नेमकी शास्त्रीय पार्श्वभूमी समजावून सांगणारे, सिद्धहस्त लेखक, बालरोगतज्ज्ञ व गेली तीन दशके...