या आत्मचरित्राच्या पानापानांतून जी माणसे दिसतील, ज्या कवी, नाटककारांचे उतारे आणि उल्लेख आढळतील, ज्या कलावंतांचे नामोल्लेख असतील, त्यांतल्या काहींनी समृद्ध केले आणि काहींनी विरोधातून खमंग चव आणली. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी आठवणी सदैव मनात ताज्या राहिल्यामुळेच मला हे आत्मचरित्र लिहिणे शक्य झाले.