‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिस्थितीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात.