या पुस्तकात विविध पर्यायांवर सखोल माहिती सुलभ भाषेत देण्यात आली आहे.
आजच्या ताणतवाच्या व स्पर्धेच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्व पटवून देऊन व हे ज्ञान सर्वांनी आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न.
सर्वच संतांनी भजन, कीर्तन, ग्रंथलेखन या द्वारे प्रवृत्ती निवृत्ती, स्वार्थ, परमार्थ, इहलोक, परलोक यांचा समन्वय करणार्या भागवत धर्माचा प्रसार केल्याची ऎतिहासिक वास्तवता लेखक बिचे समर्थपणे मांडतात.
या ग्रंथात आपल्या शब्दांना मंत्रसामर्थ्य प्राप्त करुन देण्यासाठी आपण स्वत: पाळावयाची काही पथ्ये व नियम त्यांनी सांगितलेले आहेत.
वारी एक आनंद सोहळा, या ग्रंथात त्यांनी वारी, परंपरा, इतिहास, वारकर्यांची ग्रंथसंपदा, वारकर्यांचे तत्त्वज्ञान, पालखी सोहळा, भागतधर्म आणि अशा अनेक विषयांना स्पर्श केला आहे.