सभोवतालचे कुतूहल जागृत होऊन त्याची कारणे शोधण्याची परंपरा भारतात एकेकाळी होती. त्यातून अनेक सिद्धांत मांडले गेले. ते सर्व प्राचीन विज्ञान काही काळ गोठल्यासारखे झाले. परंतु युरोपीय आधुनिक विज्ञानाने पुन्हा येथील ज्ञानकवाडे उघडली आणि येथेही डॉ. कलामांसारखे वैज्ञानिक निर्माण झाले.
आपण जेव्हा पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोतांचे पर्यावरण र्हासापासून संरक्षण करण्यासंबंधी बोलतो तेव्हा त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश या पंचमहाभूतांचा समतोल साधणे अभिप्रेत आहे.