निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत.
लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन, रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार…
झटपट पैसा कमावण्याच्या मागे धावणार्या तरूणाईची कैफियत....धन अपुरे
ऐतिहासिक व्यक्तींची रसरशीत चित्रे उभ्या करणार्या ललितरम्य कथा. प्रेम आणि वेदना यांच्यातलं नातं जणू पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांसारखं असतं. हे आशयसूत्र या संग्रहातल्या कथांच्या माध्यमातून उलगडतं. यात प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारे मेहरुन्निसा आणि सलीम आहेत, बाजीरावांच्या मृत्यूने विष प्राशन करणारी मस्तानी आहे, तर बंदेअलीच्या जीवनाचा...
‘‘तू राजांना गरुड म्हटलंस. गरुडाची घरटी जमिनीवर नसतात. ती उंच कडेकपारी असतात. गरुडाच्या पिलांना पंख फुटले की, गरुडाची आई त्यांना आपल्या घरट्यातून ढकलून देते.
रणजित देसाई यांचे हे बंध रेशमाचे तीन अंकी नाटक.
Karna The Great Warrior by Ranjit Desai Translated from The Marathi By Vikrant Pande
अफ्जलखान आणि शिवाजी महाराज या दोन राजकारण धुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजे लक्ष्यवेध
स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाची परखड समीक्षा करणारं नाटक.
‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या...
मोरपंखी सावल्या या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणार्या प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपाने एकत्रित केलेल्या आहेत.
शेवटी एकच खरं, की-पायानं अधू असणार्यांना शस्त्रक्रियेनं बरं करता येतं, हाती काठी देता येते; पण मनानंच कोणी पांगळा होऊ लागला, तर त्याला कोण काय करणार?
रणजित देसाई यांचे पंख जाहले वैरी तीन अंकी नाटक.
पावनखिंडवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या जीवनावरील कादंबरी. Pavankhind is a famous novel in Marathi. Pavankhind written by Ranjeet Desai. Pavankhind is story of great warrior Bajiprabhu Deshpande.
मी योध्दा आहे. जखमींची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरचं सुरू झालेलं हे युध्द अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. In Radheya, author Ranjeet Desai explores the eternal of question of doing what is right versus carrying out one’s duty, told through the eyes of Karna.
रामशास्त्रींच्या परखड न्यायत्वाचे दर्शन घडविणारे नाटक.
रणजित देसार्इंनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे
... साहित्य ही निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्यातरी सह जाणारी वस्तू आहे. आपलं मानवी जीवन अनेक निष्ठांच्या बळावर जगलं जातं. साहित्यातून याच निष्ठा साकारत असतात. लेखकाच्या स्वानुभवातून त्याला घडणारं जीवनदर्शन एवढ्यानं साहित्यनिर्मिती होत नसते. त्याचं साहित्य सहित म्हणजे हितासाहित असावं लागतं. लेखक निव्वळ वास्तवता टिपत नसतो. वास्तवाच्या साऱ्याच गोष्टींनी...
रणजित देसाई यांचे संगीत तानसेन हे तीन अंकी नाटक.
This is a new English translation of Ranjit Desai's much-loved Marathi classic Shrimanyogi and a literary rendition of the life of Chhatrapati Shivaji Maharaj.
”श्रीमान योगी’ ही रणजित देसाई लिखित शिवाजी महाराजांवरील चरित्र कहाणी आहे.Shrimanyogi is a biographical work on the life and the achievements of the great Maratha king, Chatrapathi Shivaji. Shriman Yogi is written by Ranjit Desai. Shrimanyogi is a biographical work on the life and the achievements of the great Maratha king, Chatrapathi Shivaji.
कै. रणजित देसाईंचा अखेरचा ललिताविष्कार:स्नेहधारा
`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. Swami is one of the best marathi kadambari by Ranjit desai. Swami is based on the life and character of Madhavrao who resurrected the Maratha empire.
English Translation of a Marathi Book - 'Swami' written by Ranjit Desai.
‘‘... वाघीण जेव्हा विते, तेव्हा पिलं टाकीत जाते. परत त्याच वाटेनं येताना जी पिलं आपल्या पावलांनी तिच्या वाटेतून दूर गेलेली असतात
‘वारसा अशाच असतो सुभाना... ते देवाचं देणं असतं. त्यागातच तो जगतो.