या ग्रंथात ज्यांच्या कविता समाविष्ट केल्या आहेत, त्या सर्व कविंप्रती मी ऋणभाव व्यक्त करते कारण त्यांच्याशिवाय या पुस्तकाची निर्मिती अशक्य होती.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या बालपणी शाळेत शिकलेल्या व ऐकलेल्या बालकविता मुखोद्गत असतात. जसे बालपण विसरता येत नाही. तशा या कविताही विसरता येत नाहीत. या बालकविता प्रौढावस्थेतही आनंद देऊन बालविश्वात घेऊन जातात.
एकीने शोधलेल्या अवकाशात स्वाभाविकपणे इतर जणींनाही श्वास घ्यायला मोकळीक उपलब्ध होणे या अर्थाने हे पुस्तक सामाजिक इतिहासाच्या दिशेने प्रवास करते.
अनेक नामवंतांची मैत्री या विषयावरची लेखनमाळ.