आपल्या शेतकरी रयतेच्या सुखासाठी स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करणारा, शेतीविषयी दूरदर्शी धोरणे राबवणारा 'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी' श्रीकांत देशमुख यांनी 'कुळवाडीभूषण शिवराय' मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नवनाथ शेळके या कादंबरीच्या नायकाची व त्याच्या भोवती फिरणार्या अनेक पात्रांची ही कहाणी. खेड्यातून शिक्षण घेवून तो एका व्यवस्थेचा अपरिहर्य घटक बनला आहे. त्याच्यासाठी ही अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने तो एकटा नाही, तो अनेकार्थांनी प्रातिनिधिक असा ठरावा. त्याचं प्रातिनिधिक असणं हाच त्याच्या संवेदनेचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल.