बालकुमार यांच्यासाठी लेखन करणार्या आणि लेखन करत आलेल्या तसंच लेखन करत असलेल्या लीला शिंदे यांचं ज्ञानूचं गाव हे लेखनही सर्वांच्या पसंतीस उतरेल असंच सुलभ, सोपं, सुंदर आहे!
जल, जंगल, हवा, जमीन, सूर्यप्रकाश, सर्व सूक्ष्मजीव, प्राणिमात्र, पक्षीजगत आणि माणूस यांचा परस्पर साखळीत सुसंवाद, समतोल असेल तरच सृष्टी सर्वांसाठी नंदनवन ठरते आणि तसं नसेल तर मानव, मानवेतर घटकाच्या अस्तित्वासाठी विदारक परिस्थिती उद्भवते.
लीला शिंदे यांचा "हिरवं हिरवं जंगल" हा बालकवितासंग्रह आहे.
बालसाहित्यात पक्षी, प्राणी, देव, देवतांसोबत परीकथांचाही फार मोठा खजिना आहे. या संग्रहात सिंड्रेला, अॅलिस, हॅन्सल आणि ग्रेटल ह्या वर्षानुवर्षे सांगितलेल्या कथा दिलेल्या आहेत.
माणसांचे जसे आपले स्वत:चे विश्व असते तसेच प्राणी, पक्षी यांचेही आपले स्वत:चे विश्व असते. त्यांच्या या जगात होणार्या मुलांना आवडणार्या मजेशीर गोष्टी या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.