आजवर अनेक मान्यवर संस्थांकडून मानपत्रे व पुरस्कार. १५-७-१९२७ ही जन्मतारीख. जन्मगाव कलेढोण, गेली ३७ वर्षे फलटणात वास्तव्य. कलेढोण, विटे, सातारा, पुणे येथे शिक्षण. २५ वर्षे महाविद्यालयाचे प्राचार्य, तीन वर्षे विद्यापिठाचे कुलगुरू, तीस वर्षे तर्कशास्त्र, तत्वज्ञान या विषयाचे अध्यापन.
जीवनात सतत कांही तरी घडत राहाते माणसाचे मन त्याचा मागोवा घेते. हळूहळू त्याला जीवन कळू लागते. त्या कळण्यामुळे तो मोहरून येतो.दिव्यामुळे प्रकाश पडतो प्रकाशामुळे दिवा दिसतो तसाच थोडाफार प्रकार जीवनचिंतनाच्या बाबतीत घडतो जीवनामुळे चिंतन संभवते.
वक्तृत्व हा माझ्यापुरता एक अनुभव विषय आहे. मी आजवर अनेकांची अनेक भाषणे ऎकली. तेवढीच भाषणे स्वत:ही केली. बोलणे माझ्या वाट्याला आले आणि मी बोलण्याच्या वाट्याला गेलो. आपण सतत बोलत राहावे आणि बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे, असे मला लहानपणापासून वाटत असे. पण बोलायचे कोणाशी? बोलायचे कशासाठी?
श्री अरविंदाची चरित्रकथा हे इहलोकीचे एक नवल आहे. भूतकाळात घडलेले, वर्तमानाच्या सीमेला येऊन भिडलेले व भविष्याबरोबर विस्तार पावणारे श्री अरविंदाचे दिव्य जीवन हा अनेकांच्या उपासनेचा विषय झाला आहे. श्री अरविंद हे एक व्यक्तिमत्व राहिले नाही.
वडिलधार्यांची लहानांविषयी एक कायमची तक्रार असते. आजकाल मुले काही करीत नाहीत. नुसती धावतात, धडपडतात, अडखळतात, ठेचाळतात, हसतात, खिदळतात आणि उधळतात. त्यांच्या येण्याजाण्याला, धावण्यापळण्याला, उठण्याबसण्याला अर्थ नाही. आपली मुले म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात.
ज्या विविध प्रश्नांचा मागोवा माणसाचे मन घेऊ पहाते त्या प्रश्नांच्या संदर्भात केलेले हे मुक्त चिंतन आहे. पण ते स्वॆर चिंतन नाही. साधार आणि सप्रमाण विचार शक्यतो तर्कसंगत पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न आहे.