स्वराष्ट्र निर्मितीसाठी ज्या असंख्य बालवीरांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता मुक्तिसंग्रामात उड्या घेतल्या आणि आपल्या नेत्यांचे शोनार बांगलाचे स्वप्न साकार करण्यात हातभार लावला त्या बंगलाच्या बालवीरांच्या त्यागाच्या आणि पराक्रमाच्या कथा.
भारताच्या इशान्य भागातील राज्यांमध्ये 1976 पासून मेंदूच्या मलेरियाने उग्र रूप धारण केले होते. त्याच्या प्रतिबंधासाठी भारत सरकारने इतर राज्यांतून काही निवडक अधिकारी त्या भागात पाठविण्यात आले. त्यात लेखक राजा लिमये यांची निवड झाली होती. गारोंच्या जंगलातील चित्तथरारक, मनोरंजक घटना एक तरुण जोडप्याच्या जीवनातील घटनांमध्ये गुंफून मांडली आहे.
कॅप्टन राजा लिमये लिखित लहान मुलांसाठी एक रंजक असे ‘झुंजार छत्रपती संभाजी’ पुस्तक.
या पुस्तकात अनेक सेनानींच्या रोमांचक अशा युद्धकथांतून त्यांच्या चातुर्याचे दर्शन घडते. कधी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा वापर करून, तर कधी निसर्गाची साथ मिळवून त्यांनी शत्रूवर कशी मात केली याचे वर्णन केले आहे.