अंबरीश मिश्र यांचे आत्मचरित्र
गुलजारजींच्या‘ड्यॊढी’च मराठी अनुवाद.
‘गांधीजीना संस्मरणो’या मूळ गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद
काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्रयलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्वल अन् उदासही.
गुलजारांनी 1971 साली त्यांचा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. हा पहिला सिनेमा होता ज्याची पटकथा आणि दिग्दर्शन दोन्ही गुलजारांनी केलं होतं. यानिमित्तानं बॅलीवूडमध्ये एका तरल भावस्पर्शी कथांच्या चित्रपटांचा पटच सुरु झाला.
आपल्या प्रासादिक कलागुणांनी साहित्य, नाटय, संगीत अन् सिनेमाचा परिसर उजळून काढणारी सात कलंदर व्यक्तिमत्त्वं या पुस्तकाला रेलून उभी आहेत.
सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते, तो हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ.