" जीवन विकास" मासिकात जी संपादकीय लेखमाला प्रसिध्द झाली होती तिचे संकलन प्रस्तुत पुस्तकाच्या रुपात केले आहे.
उपनिषदांनी दिलेला संदेश आधुनिक मानवाला यथार्थ जीवनदृष्टी देतो,जगाकडे पाहण्याचा सम्यग दृष्टिकोन देतो आणि समूढ मानवाला सुखशांतीचा मार्ग दाखवतो.
मानवजीवनाचे अंतिम ध्येय जे आत्मज्ञान, आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली साधना यासंबंधीचे मुलगामी विवेचन प्रस्तुत पुस्तकात सुबोधपणे केलेले आहे.
अध्यात्मिक अनुभूतीचे खरे स्वरुप कळण्यासाठी प्रस्तुत पुस्तकाचा खचित उपयोग होईल.
आजच्या काळातील हिंदू स्त्रियांसमोर घर की घराबाहेर, नवे की जुने असे अनेक प्रकारचे प्रश्न उभे आहेत आणि या प्रश्नांना तोंड देता देता त्या मेटाकुटीस आल्या आहेत.
कठ उपनिषद हे अतिशय काव्यमय आणि अत्यंत महत्त्वाचे असे एक उपनिषद आहे.
मानवी जन्म सफल होण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे असा सर्व उपनिषदांचा सारभूत संदेश आहे. केनोपनिषदसुध्दा याच रस्त्यावर भर देऊन मानवमात्राला याच जीवनात आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अज्ञानाच्या व अपूर्णतेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कळकळीचे आवाहन करीत आहे.
आम्हाला हवे आहे चिरतृप्तिकारी अमृत रस काव्य आणि त्याचे प्रसाददान देणारे अमृतस्य पुत्र,जीवनसिध्द-कवी ज्ञानेश्वर
हा चरित्रग्रंथ सर्व मुमुक्षूंना, भक्तांना, कार्यकर्त्यांना अमोघ मार्गदर्शन करणारा व सतत स्फूर्ति देणारा होईल.
मराठी मासिकात "जीवन विकासात" वेळोवेळी आलेले लेख एकत्र करुन "स्वप्न-योग अथवा स्वप्नांचा अर्थ" ह्या नावाने प्रस्तुत पुस्तकाच्या रुपात वाचकांना सादर केला आहे.
स्वामी शिवतत्त्वानन्द लिखित वर्तमान जग आणि श्रीरामकॄष्ण-विवेकानंद.
या याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवादाचे वैशिष्ट्य असे की ब्रह्यज्ञ ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांची ब्रह्यवादिनी पत्नी मैत्रेयी यांचा सारगर्भित, तलस्पर्शी संवाद जगाच्या प्राचिन आध्यात्मिक इतिहासात अनन्य साधारण असा आहे.