पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी... त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.
आत्मचरित्राची वाड:मयीनदृष्ट्या सर्वांगीण आणि तात्त्विक चर्चा करणारा स्वतंत्र असा ग्रंथ नव्हता. त्या दृष्टीने `आत्मचरित्र मीमांसा` हा मराठीतील पहिलाच ग्रंथ.
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत.
विविध मानवी स्वभावांचा मार्मिक वेध, बदलत्या खेड्याचे अंतर-स्पर्शी सूक्ष्म तणाव, समाजाच्या आणि व्यक्तींच्या जीवनातील विपरीत नाट्य, सखोल गहिरे कारुण्य, उत्कट काव्यात्मकता, ग्रामीण शृंगार आणि अनघड पौरुष, स्पंदनशील मनाची प्रतिमायुक्त चिंतने आणि चैतन्यपूर्ण लवचिक भाषा यांनी यादवांची कथा इथे डवरलेली आहे. कलात्मकतेचे आणि सच्च्या सामाजिकतेचे संयमी भान त्यांनी या...
आनंद यादव यांची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरली.असे असले तरी स्वत:त न रमता त्यांनी आपुलकीने अनेक नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले.त्यांच्या लेखनाला प्रोत्साहन दिले ग्रामीण साहित्य चळवळ केली नि त्या बाबतीत सामाजिक धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादव यांची ही बांधिलकी मोठी आहे.
‘झोंबी’ ते ‘घरभिंती’ या प्रवासपटातून प्रभावीपणे ग्रामीण जीवनाचे उभेआडवे ताणेबाणे प्रथमच त्यांतील खऱ्या छेदाभेदासकट विस्तृत प्रमाणात साहित्यरूपाने साकार होतात
भेटणाऱ्या व्यक्ती, घडणाऱ्या घटना, निर्माण झालेली विपरीत स्थिती यांतून तो आकाराला येतो. त्यामुळे तो प्रसन्न आणि दिलखुलास; तरीही समाजातील विविध प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारा वाटतो.
स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षातील ग्राम संस्कृती:दशा आणि दिशा
`झोंबी`, `नांगरणी` आणि `घरभिंती` या आत्मचरित्राच्या तीन खंडांनंतरचा हा चौथा खंड काचवेल.
शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे.
दर्शनी स्वरूपात `मायलेकर` हा काव्यात्म संवाद आहे. शिक्षण संपवून घरी परतलेल्या मुलाला पाहून आनंदलेली आई आपली स्वप्न खरी होणार या अपेक्षेने मुलांपुढे मांडते आणि शहरी संस्कारामुळे नवी नजर घेऊन आलेला मुलगा आपली स्वप्नं भिन्न असल्याच सांगतो. उभयतांच्या स्वप्नाची परिभाषा बदलली असली तरी दोघांचा भावविश्व एकच आहे. वात्सल्यापोटी मुलाच्या सारया आठवणी आईच्या उरात...
आनंद यादव विनोदी कथा शाब्दिक कोटिक्रम किंवा भाषिक विनोदावर आधारलेली नाही. ती ग्रामीण जीवनातील व्यक्ती, प्रसंग, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती यांच्यावर आधारलेली आहे
उपमारूपकांप्रमाणे यादवांची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागते. आणि मग ‘सपनं पडत्यात’ सारखी समर्थ कविता निर्माण होते.
माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसार्यात लेखकाचे कुटुंबीय, स्नेही-सोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समावि होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते.
‘नांगरणी’तील आंदोलने ही,आपल्या कुटुंबासह आपल्याला माणसासारख्र जगता यावे म्हणून खालच्या सामाजिक स्तरातून वरच्या सामाजिक स्तरात जाऊ पाहणाऱ्यासंवेदनशील तरूण मनाची आहेत.
नागपूर प्रसिद्ध कादंबरीकार श्री. मनोहर तल्हार लिहितात.... 'नटरंग’ वाचली. शेवटचे पान मिटले आणि लगेच पहिल्या पानापासून पुन्हा दुसर्यांदा वाचून काढली. 'नटरंग’ ने मला झपाटून टाकले.
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही.
डॉ. आनंद यादव यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे, 'साहित्याची निर्मिती कशी होते ?’ या जटिल प्रश्नाची उकल करणारा एक महत्त्वाचा तात्त्विक ग्रंथ होय. मराठीत तरी हा ग्रंथ एकमेव, नि अजोड म्हणावा लागेल.
आनंद यादवांचा साहित्यिक अनुभव
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील,चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या वाटणार्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या...
युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्ध-पराक्रमांचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धांत ज्यांनी विशेष पराक्रम...
सद्य राजकीय-सामाजिक स्थिती म्हणजे विसंगतीचे भेंडोळे आहे. ह्या भेंडोळ्यात सारी नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे. ही स्थिती कोणाही विचारवंताला विचारात पाडणारी आहे. यादवांसारख्या विचारवंत लेखनाला तोवर कोरडे ओढावेसे वाटणे साहजिकच.
शृंगाररसाचे मन मोकळे, आस्वादक आविष्करण मराठीमध्ये अभावानेच आढळते. ललितगद्यातून शृंगारविषयक अनुभव 'मी’च्या नावे व्यक्त करण्याच्या बाबतीत मराठी ललितगद्य अजून सोवळेच आहे असे लेखकाला वाटते हा सोवळेपणा सोडून आस्वादाच्या पातळीवरून स्त्रीपुरुष व अनुषंगिक विविध अनुभव मांडण्यासाठीच हे ललितलेख लिहिले आहेत.
ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी झालेले जाणवते.
या कथेतील आशय, आत्मा मात्र सर्वच मानवी आहे आणि हेच झाडवाटा चं वैशिष्ट्य आहे.
१९९० साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘झोंबी’ या पुस्तकाचा अनुवाद हिंदी,बंगाली,कन्नड भाषांत झालेला आहे. Zombi literally means wresting. Zombi is an account of a youth from interior Maharashtra. Zombi is written by Anand Yadav.