सुप्रसिद्ध बंगाली लेखक विभूतिभूषण बंद्योपाध्याय यांची आरण्यक ही आणखी एक महत्त्वाची कादंबरी. ही कादंबरी म्हणजे अनेक आघाती कारणांनी दृष्टिआड होत चाललेल्या वन्य जीवनाचे जीवंत चित्र आहे. बंद्योपाध्याय यांच्या लेखनात अस्सल भारतीय जीवनाचे अतिशय सूक्ष्म निरीक्षण आणि तरल संवेदनशीलतेने केलेले व्यक्ि तचित्रण यांचा साक्षात प्रत्यय ह्याही कादंबरीत आपल्याला येतो. या...
‘पथेर पांचाली’ ही पूर्व बंगालमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या एका गरीब भिक्षुकाच्या कुटुंबाची कहाणी आहे.