Dr Nila Pandhare
बाबा आमटे यांचे जीवन म्हणजे एक चमत्कार आहे. त्यांची जीवनगाथा अखंड प्रेरणादायी आहे.
आधुनिक संत विनोबा भावे हे गांधीजींचे ‘आध्यात्मिक वारसदार आणि मानसपुत्र म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व बहुरुपी पु. ल. देशपांडे. जीवनावर आणि माणसांवर मनापासून प्रेम केले. लोकांना हसवले आणि विचार करायला प्रवृत्त केले.
डॉ. आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.
दोन विद्वानांचे पटत नाही तसे दोन स्त्रियांचेही पटत नाही असा समज आहे. या दोघी तर विदुषी
देशासाठी प्राणार्पण करायला ज्यांनी मागेपुढे पाहिले नाही, अशा स्वर्गीय इंदिरा गांधी यांची ही चरित्रगाथा.
डॉ. नीला पांढरे लिखित महाराष्ट्रातील समाजसुधारक ‘गोपाळ गणेश आगरकर’ यांचे चरित्र
महाराष्ट्रात त्यांच्यामध्ये ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने ‘शतपत्रे’ लिहिणारे गोपाळराव देशमुख अग्रभागी आहेत.
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मौलिक कार्य केलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे.
न्या. रानडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रोद्धारासाठी खर्च केले. त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
भारतातील हरित क्रांतीची अग्रदूत, लोककल्याणकारी राजा म्हणून रा.शाहू यांनी कीर्ती संपादन केली. त्यांचे हे बहुविध कार्य नव्या पिढीपुढे यायला हवे म्हणून हा पुस्तकप्रपंच.
समाजप्रबोधनामध्ये पुरूष समाजसुधारकांप्रमाणे स्त्रीसुधारकांचाही सहभाग होता. या पुस्तकात त्यांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे.
महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा जीवनपट हा अनेक प्रेरणादायक घटनांनी परिपूर्ण असा आहे.
नीला पांढरे लिखित मराठी समीक्षेची वाटचाल.
जवाहरलाल नेहरुंच्या देखण्या, राजबिंड्या रुपाची हसरी प्रतिमा लोकांच्या मनात आजही जागृत आहे.
प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि विविधांगी साहित्याचा सखोल परिचय.
पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण या क्षेत्रांत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणे यांचा वाटा मोलाचा आहे.
20 जानेवारी २००९ या दिवशी बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे ४४ वे राष्ट्रध्यक्ष झाले आणि कृष्णवर्णीय वंशाचे पहिले प्रतिनिधी म्हणून व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले.
मराठी वाड्मयातील नाट्य, काव्य आणि विनोद या तिन्ही क्षेत्रांत राम गणेश गडकरी ह्यांनी आपला ठसा उमटवला.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या पुरुषांना त्यांच्या पत्नी प्रेरणा देत असतात.
महाराष्ट्राला समाजसुधारकांची एक परंपरा आहे. महात्मा फुले यांचे चरित्र आणि साहित्य आजही समाजाला मार्गदर्शक आहे.
‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे, रामेश्वरमसारख्या छोट्या बेटावर तामिळ नावाड्याच्या पोटी जन्माला आलेले भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती.
शिवचरित्र व इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
भारताला जाणून घ्यायचे असेल तर विवेकानंद वाचा. त्यांचा ग्रंथांचा अभ्यास करा. तेथे सारे सकारात्मक आहे. नकारत्मक काही नाही. - रवींद्रनाथ टागोर