कथात्म साहित्य व त्या वर्गातील कथा हा साहित्यप्रकार यांविषयीच्या तत्वविचाराची मांडणी आणि १९४५ नंतरच्या वाङमयीन कालखंडातील चार मराठी लेखकांच्या कथासाहित्याची प्रत्यक्ष समीक्षा, असे स्थूलमानाने या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप आहे.
मराठी कथा हा सुधा जोशी यांच्या आस्वादाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.
आजवर मराठीत झालेल्या समग्र एकांकिका-लेखनाचा विस्तार समोर ठेवून, त्यातील महत्त्वाचे टप्पे व प्रकार शक्यतो या संकलनात सामावले जावेत, ही भूमिका निवडीमागे आहे.
गेल्या शतकातील मराठी कथेचे प्रवाह, कथाकारांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण आणि एकूणच मराठी ललित साहित्याचं पर्यावरण यांच्या डोळस परिशीलनातून घडत गेलेली आहे.