कंडम बर्गड्यांच्या जनतेवरी| स्मगलर, बिल्डर, गुंड राज्य करी|| प्रत्येक नेता खिसे भरी| हाती धरोनि तयांसि...|| असे या समाजाचे प्राक्तन असल्यामुळे, ज्यांच्यावर अतुल कुलकर्णी यांनी हा उपरोध रोखला आहे त्या गेंड्याच्या कातडीची कुंडली कोणी मांडावी? एवढे खरे की, जनतेला हा उपरोध रुचेल. मलाही तो रुचला आहे.
हे पुस्तक म्हणजे लेखकाने केलेले प्रॅक्टिकल जर्नालिझम चा वस्तुपाठ.
हे पुस्तक नाही, ही एक सुरेल साहित्यिक मैफिल आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आजुबाजुला दिसणार्या माणसांच्या कहाण्या सांगणारी आणि त्या कहाण्यांच्या पलिकडे घेऊन जाणारी..