कथानुभवांचे अंत:पदर सूचक, संयत आणि अकृत्रिम शैलीतून उलगडत जाताना संगीतातल्या आर्त स्वरांसारखे ते व्याकूळ करत राहतात. ही व्याकुळता हाच या कथांचा गाभा आणि त्यांचे सौंदर्यही.
स्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेने जाणारी कादंबरी.