दुसरा कथासंग्रह. वर्हाडी, ग्रामीण, कोरकू आणि गवळी समाजाचे ह्रदयस्पर्शी चित्रण हे त्यांच्या कथांचे आशयसूत्र याही कथासंग्रहात कायम आहे
एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते.
`येंजो’ ही मेळघाटातील चमोलीसारख्या आडवळेणी दुर्गम भागातील आदिवासी तुमला-हिरय यांच्या सांसारिक, सांस्कृतिक वाताहतीची वास्तवदर्शी कहाणी.