गेली सात वर्षे आफ्रिकेत वास्तव्य आणि प्रवास करत असलेल्या लेखकाला तेथे अनेक गमतीशीर अनुभव आले आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांची माणसे भेटली. त्या अनुभवांना कल्पनाविलासाची बेमालूम जोड देऊन ‘आफ्रिकी आतषबाजी’ कथा साकार झालेल्या आहेत.
दृष्टीपालीकडील सृष्टी' मध्ये आहेत आफ्रिकेतील अमानुष विळख्याची व्याप्ती आणि निष्पत्ती सिद्ध करणाऱ्या बारा मनोरंजक सत्यकथा.
विविध देशांमधील मैत्री संस्कृतीच्या विविध अनुभवांच्या सोप्या, आकर्षक पण वास्तव कथा !
भारतीय इतिहासातील १७व्या व १८व्या शतकात मराठ्यांचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फ्रेंचांबरोबर निर्माण झालेल्या त्यांच्या संबंधांमुळे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला अनेक धोरणे बदलावी लागली. १८व्या शतकामध्ये मराठा राज्याचे मराठा मंडळामध्ये रुपांतर झाले.
आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत राहतात.
मसाई ही केनिया आणि टांझानियात आढळणारी वैशिष्ट्य पूर्ण जमात. आफ्रिका खंडाचे वसाहतीकरण, ब्रिटिश राज्यकर्ते आणि स्थानिक जमाती यांच्यातील तणाव, केनियाचा स्वातंत्र्यलढा, त्यातील भारताचा सहभाग अशा वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीवरील काही सत्यघटनांवर ‘मसाई’ ही कादंबरी आधारित आहे.
लेखक उमेश कदम यांनी लिहिलेल्या या संग्रहातील सर्व कथा आफ्रिकेतील युद्धे, हिंसाचार व इतर समस्यांवर आधारित आहेत. एका प्रचंड खंडातील विदारक व हृदयद्रावक सत्य परिस्थितीवर प्रकाशझोत टाकून या कथांच्या माध्यमातून या भूमीतील सर्वसामन्य जनतेच्या व्यथा मराठी वाचकांसमोर प्रभावीपणे मांडल्या आहेत.
व्हिएतनाममधील एका निष्पाप खेड्याची अमेरिकन सैनिकांनी केलेली अमानुष कत्तल.