प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.
गाडगीळ - गोखल्यांची नव - कथाही जुनी वाटावी इतक्या नव्या आणि अनपेक्षित वाटांनी मराठी कथा गेल्या काही वर्षात पुढेनिघाली आहे.
सहसा पांढरपेशा वाचकाला न भेटणारे अनुभव, त्यांची थेट व आरपार हाताळणी, कथेतील रौद्र नाट्य हेरुन ते साक्षात समोर उभे करण्याचे सामर्थ्य आणि मानवी मनातला हळवा गुंता हळूवार हाताने सोडवून तो नेमका मांडण्याचे कौशल्य ही या कथांची वैशिष्ट्ये.
इतरांची आत्मसंतुष्टता आणि अल्पसंतुष्टता लेखकाला भेटू शकत नाही. इतरांसारखे मन:स्वास्थ्य त्याच्या वाटयाला असत नाही.
वाचकांसमोर उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करूणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली तिच्यापाशी आहे.
लेखिकेची एकेक कथा म्हणजे तिने आणि तिच्या आजुबाजुच्या माणसांनी घेतलेले, जगलेले अनुभव आहेत.