Dr Mohamed Khadra
सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं. आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं. एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात.
सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रूस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं. त्याच्याजवळ काय नाही? लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी! त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही.