‘मी जेव्हा एका पत्र्याच्या, पाणी झिरपणा-या होडग्यातून ‘लव्हेट बे’ला घर पाहायला निघाले, तेव्हा मला माहीत नव्हतं की, माझा प्रवास सुरू झाला होता. फिकट पिवळा रंग, भक्कम खांब आणि प्रशस्त व्हरांडा असलेल्या उंच खडबडीत टेकडीवरच्या त्या बंगल्यात माझ्या नव्या आयुष्याची पहाट होणार होती.’