आजच्या काळात पर्यावरणीय समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, पाणी बचत आदि उपायांचा अवलंब करण्यास सांगितले जाते. यापुढे जाऊन पर्यावरण विकासाचा, संवर्धनाचा कशाप्रकारे विचार करता येईल याची मांडणी युवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी पर्यावरण आणि विकास या पुस्तकात केली आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्न...