सोळाव्या शतकातील इटलीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक पाश्र्वभूमीचं यथार्थ दर्शन घडवून मंत्रमुग्ध करेल. देवतार्पण झालेल्या जोगिणींची ‘सेक्रेड हार्ट्स’– पवित्र अंत:करण– कशी राजनैतिक खेळी खेळतात ह्यात गुंगलेला वाचक कादंबरीच्या अनपेक्षित सुखान्त समारोपानं हर्षोत्फूल्ल होईल. वेगळ्या विषयावरील अनोखी कादंबरी!