सर्वसामान्यांचे जीवन, भावभावना, नातीगोती हे सारे त्यात सहजतेने येते. ‘साध्याही विषयात किती आशय मोठा सापडे’ अगदी या अर्थाचेच त्यांचे लेखन! नव्या जुन्या कथांचा हा संग्रह वाचक नक्कीच स्वीकारतील.
आशापूर्णादेवींनी तत्कालीन स्त्रीजीवन अतिशय उत्कटतेने व प्रतिभेने चित्रित केले आहे. नायिकेच्या माध्यमातून त्यांनी आजच्याही स्त्रियांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञाच दिली आहे.