Dr Devdatta Ketkar
काही गोष्टींनी तुम्हाला हसू येईल... काहींनी डोळ्यांत पाणी येईल... पण त्या तुम्हाला खिळवून ठेवतील, हे नक्की!
सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं. आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं. एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात.
आयआरए'च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. 'एसएएस'च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - 'शूट टू किल.'
सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रूस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं. त्याच्याजवळ काय नाही? लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी! त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही.