इतिहास म्हणजे फक्त राजकीय नसतो. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा त्यात समावेश असतो. श्रध्दा फक्त धार्मिक नसतात, तर समाजाच्या जीवनविषयक श्रध्दा, अभियांत्रिकी, वैज्ञानिक संकल्पना त्याने उभरलेल्या निर्मितीतून कळतात. त्याही अभ्यासण्याची आवश्यकता असते.
सर्वसामान्य भारतीय स्त्रियांच्या जीवनाचा शोध घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच तिची मिमांसा आहे.
भारतीय गणिताचा विकास आणि वाटचाल व पाश्चात्य गणिताचा विकास आणि वाटचाल यांतील मूलभूत फरक सुधा रिसबुड यांनी मांडला आहे.
विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन.’
आईनस्टाईननंतर फिजिक्स ज्या टप्प्यावर काही काळ थांबलं होतं, त्या टप्प्यावरून फिजिक्सला पुढे नेण्यामध्ये रिचर्ड फाईनमन यांचा सिंहाचा वाटा होता