तुलना होऊ न शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबरोबर मुकाबला करताना आपल्या मनाची पकड घेणारी आणि चांगली कामे करण्यास उत्तेजन देऊन आश्चर्यचकित करणारी, धैर्य आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवणारी ही सत्य कहाणी. अन्यायाविरुद्ध उठणारा फक्त एक आवाज किती किमया करू शकतो, याचा प्रत्यय देते.
१९९३ साली के-२ शिखरावरील थरारक आणि अनर्थकारी मोहिमेवर अयशस्वी ठरलेला गिर्यारोहक ग्रेग मॉर्टेनसन, गारठलेल्या आणि पाण्यावाचून शुष्क झालेल्या अवस्थेत, वाट चुकून पाकिस्तानातील काराकोरम पर्वतराजीतील एका दरिद्री खेड्यात पोहोचतो. खेड्यातील लोकांच्या दयाळूपणाने भारावलेला मॉर्टेनसन परत येऊन मुलांसाठी शाळा बांधण्याचे वचन देतो. दिलेल्या वचनाची पूर्तता आणि मिळालेले...