अफवा ही खोटीच असते. ती भयकारी, दहशत माजवणारी, समाजातल्या दुफळ्या रुंदावणारी म्हणजे नकरात्मकच असते
या पुस्तकामध्ये कविता, लेख, फेसबुक पोस्टी या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या संदर्भात एकमेकांच्या समोर उभ्या केल्या आहेत, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रकारांमध्ये असणे हे ‘अर्वाचीन आरण’चे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट आहे.
सद्यःस्थितीत मराठीत उत्तम कवी वाढताहेत, पण उत्तम कविता मात्र वाढत नाही, अशा कष्टदशेत प्रज्ञा दया पवार यांच्या ’दृश्यांचा ढोबळ समुद्र’ ह्या संग्रहातल्या कविता नवी अंतर्दृष्टी देणार्या वाटल्या- भालचंद्र नेमाडे