देशातील सर्वांत लाडक्या शिक्षकाच्या स्मृत्यर्थ ‘याचि सम हा’ असे अत्युत्कृष्ट शिक्षक म्हणून डॉ. कलाम ओळखले जातात. त्यांचे बोल, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली अनेक दृष्टींनी स्वतंत्र वस्तुपाठ आहेत.त्यांचा जवळून सहवास लाभलेले आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शिष्य सृजन पाल सिंग यांनी हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे.