आचार्य चाणक्यांनी आयुष्यभर जे जे म्हणून केलं, ते इतिहास बनलं, जे जे कथन केलं, ते सुभाषित बनलं. सुमारे 2300 वर्षापूर्वीचे त्यांचे बोल. त्यांचे विचार त्याकाळी जेवढे कालसुसंगत होते तेवढेच ते आजदेखील आहेत. त्यांचा एक शब्द अनुभवांच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या शुद्ध बावनकशी सोन्याप्रमाणे आहे.