Dr Shashikant Lokhande
डॉ. शशिकांत लोखंडे हे इतिहासाच्या जळत्या संदर्भबंधात आणि वर्तमानाच्या अस्वस्थ वास्तवात उभं राहून स्वत:ला साहित्यात रुपांतरित करणार्या एका निष्ठावंत प्रतिभेचे विशेषनाम आहे. त्यांच्या वाड्मयीन व्यक्तिमत्त्वातील मोठ्या बौद्धिक कुवतीचा समीक्षक आणि अत्तदीप धाटणीची प्रतिभा असलेला ललितलेखक या दोन्ही फांद्या परस्परपोषकच आहेत.
वास्तवानुभूतीचे प्रतिभेच्या साहाय्याने कलाविषयात रूपांतर करण्याचे कार्य कलावंताची कल्पनाशक्ती, कलौचित्र, चिंतनशील प्रतिभा आणि कलावंताची अंतर्दृष्टी यांच्या कल्पातून होत असते.
साहित्य आणि ललित कला, विश्वात्म जीवन यांच्या आकलन, आस्वादन आणि मूल्यमापन ह्या परिक्षेत्रातील स्वरुपांची, प्रश्नांची गंगोत्री ‘सत्य, शिव आणि सुंदर’ ही मूलव्यवस्था आहे.
साहित्याचे जग हे सौंदर्याच्या अलिखित नियमाने घडलेले आहे. कल्पनाशक्तीच्या साहाय्यानेअनुभवाची एक अभिनवसृष्टी निर्मान झालेली आहे.