नव्या जगात झेपावण्यासाठी आणि यशस्वी होण्याची इच्छा बाळगणार्या प्रत्येकासाठी
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व अशा या निवडणुकीचे हे दस्तऎवजीकरण आहे. हे लेखन कुणा संशोधकाचे नाही. काठावर बसलेल्या कथित नि:पक्ष पत्रकाराचे हे निरुपणही नाही, तर आग्रही भूमिका घेत लोकांच्या बाजूने निवडणुकीत उडी घेतलेल्या एका संपदकाचे हे संवादी ’स्टेट्मेंट’ आहे.
सॉक्रटिसने प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून संवाद केला होता. त्या स्वरुपाचा हा प्रयत्न आहे. भारताचा आशय सांगणारे हे पुस्तक सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचे ठरु शकते. ‘आम्ही भारताचे लोक’ काय करु शकतात, हे यातून अधोरेखित होते. ‘आयडिया ऑफ इंडिया’ सांगणारी ही संवादी पत्रे सर्वांनी वाचायला हवीत. ...- पृथ्वीराज चव्हाण