2014 मध्ये मोदींना लोकांनी भरभरून मते का दिली? आजही पाच वर्षानंतर मोदींची लोकप्रियता का टिकून आहे?
सहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदीच भाजपाला लोकसभेत बहूमत मिळवून देतील असे भाकित करुन, त्याची तार्किक मांडणी करणारे ते बहुधा एकमेव पत्रकार होते. आजही प्रचलित पत्रकारितेच्या प्रस्थापित मताला झुगारुन त्यांनी नऊ महिने आधीच मोदी येत्या लोकसभेत ३००+ जागा जिंकतील असे भाकित केले आहे आणि त्याची प्रदीर्घ कुंडली म्हणजे हे पुस्तक आहे.