राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रभक्ती यांचे अपूर्व दर्शन प्रथमत: घडले ते 1857 च्या स्वातंत्र्यसमरात. भूमातेच्या परदास्यमुक्तीकरिता भारतीय जनतेने ब्रिटीशांविरुद्ध एकत्रितपणे दिलेला हा पहिला लढा. या लढ्यातच बीज पेरले गेले ते स्वातंत्र्याच्या उष:कालाचे. प्राणांची आहुती देऊन लढलेल्या वीरांचा हा कादंबरीमय इतिहास. सळसळणार्या रक्ताचे, उत्स्फूर्त एकोप्याचे, अपार...