आपण जन्म दिलेल्या मुलानं सर्वार्थानं मोठं व्हावं,आपल्या ’आयुष्याच्या संध्याकाळी’ त्यानं आपल्याला आधार द्यावा,आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखानं व्यतीत व्हावी,एवढीच अपेक्षा आपल्या मुलाकडून आई-वडिलांची असते.
पाचोळा, सावट, आमदार-सौभाग्यवती, चारा-पाणी या रा.रं.बोराडे यांच्या प्रकाशित कादंबर्या. यातील प्रत्येक कादंबरीचा विषय वेगळा आहे. प्रत्येक कादंबरीची प्रकृती भिन्न आहे.
लावणीनृत्याचे कार्यक्रम हाऊसफुल जात आहेत. एका पिढीजात लावणी नृत्यांगनेची संघर्षमय कथा.