’राजतरंगिणी’ म्हणजे राजांची नदी. राजवंशांचा प्रवाह.काश्मीरच्या भूमीवर आदिकाळापासून जे राजे होऊन गेले,त्यांच्या राजवटींचा हा काव्यमय इतिहास आहे. कल्हण कवीने बाराव्या शतकात रचलेला हा ग्रंथ म्हणजे भारतात आजपर्यंत उपलब्ध झालेला इतिहास म्हणावा अशा योग्यतेचा एकमेव प्राचीन ग्रंथ आहे.